Monday 7 November 2016

कोणीतरी असावी




कोणीतरीअसावी
उसळणारया हास्याच्या लाटेला साथ देणारी
गजबजलेल्या एकांतात सोबतीचा हात देणारी
भरकटलेल्या मनाला विचारांची वाट देणारी

कोणीतरी असावी
भरलेल्या डोळ्यातील आसवांना हास्याने मात देणारी
हरलेल्या आशेच्या रात्रीला नवी पहाट देणारी
थकलेल्या प्रयत्नांना लढ़ण्याचा विश्वास देणारी

कोणीतरी असावी
मनाच्या कोपरयात मैत्रीचे भाव बणून साठणारी
अबोल ओठावरचे शब्द नजरेतूनच वाचणारी
कोणीतरी असावी..  अनोळखी असूनही आपलीसी वाटणारी



No comments:

Post a Comment